जेऊर पाटोद्याचा पाणी प्रश्न मार्गी लावू – ना. आशुतोष काळे

जेऊर पाटोद्याचा पाणी प्रश्न मार्गी लावू – ना. आशुतोष काळे

Let’s solve the water problem of Jeur Patodya – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon21 Fab2022 16:00Pm.

कोपरगाव : मतदार संघातील रखडलेल्या पाणी योजनाप्रमाणे जेऊर पाटोद्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पाण्यासंबंधी अडचणी मांडणाऱ्या जेऊर पाटोदा ग्रामस्थांना शिवजयंती कार्यक्रमातील भेटीत दिली.

यावेळी ना.आशुतोष काळे म्हणाले, धारणगाव पाणी पुरवठा योजना रखडल्यामुळे जेऊर पाटोद्याबरोबरच धारणगाव, हिंगणी, चांदगव्हान, मुर्शतपूर या गावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मात्र यापुढे या सर्व गावांचे नवीन सुधारित प्रस्ताव तयार करून असलेल्या त्रुटी दूर करून सर्व अहवाल शासनदरबारी दाखल करणार असून जेऊर पाटोद्यासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून जेऊर पाटोद्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी काम हाती घेतले आहे. असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भाऊसाहेब भाबड, माजी संतोष चवंडके, सनी वाघ, सौ. भारती भाबड, अशोक निकम, अशोक बोऱ्हाडे, अनिल लकारे,सचिन शेवाळे, नितीन शिंदे, नानासाहेब बाविस्कर, साईदीप पवार, संतोष माळी, सौ.आशाताई भिंगले, सौ. सोनाली बोऱ्हाडे, सौ. वैशाली शिंदे, सौ. पूजा बाविस्कर, हिरगळ, बबनराव जाधव, देविदास सपकळ, सौ. सुधा निकम, सौ. शोभा लकारे, संदीप जाधव, गणेश शेवाळे, बाळासाहेब मोरे,जगमोहन राजपाल, प्रीतेश माने, सौ. अर्चना लाड, राजेंद्र होन आदींसह जेऊर पाटोद्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page