कार्यकर्त्यांनी भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी-स्नेहलता कोल्हे.

कार्यकर्त्यांनी भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी-स्नेहलता कोल्हे.

Activists should make BJP contact campaign effective- Snehalta Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon21 Fab2022 16:10Pm.

कोपरगांव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधुन भारतीय जनता पक्षाची विचारधारा जनसामान्यापर्यंत रूजविण्यांचा प्रयत्न केला असुन कार्यकर्त्यांनी शक्ती केंद्र सशक्तीकरणातुन भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी असे प्रतिपादन प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी बैठकीत केले. अध्यक्षस्थानी उत्तर नगर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर हे होते.

प्रारंभी भाजपाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, भायुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, महिला तालुकाध्यक्षा वैशाली साळुंके, शहराध्यक्षा वैशाली आढाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. जिल्हा ओबीसी अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, दिव्यांग तालुकाध्यक्ष मुकूंद काळे, बाळासाहेब अहिरे, हरिभाउ लोहकणे, चंद्रभान रोहाम, डॉ. देसाई, संदिप देवकर, आदिंची भाषणे झाली.

सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, राज्यातील महाविकास आघाडी शासन व त्यांचे जबाबदार मंत्री भाजपाची ताकद मोडु पहात आहे. केंद्र सरकारविरूध्द चिखलफेक करून विकासापासून लक्ष विचलीत करण्यांचा त्यांचा डाव आहे. तेंव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला प्राधान्य देवुन आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेवुन बुथनिहाय मतदार जोडण्यासाठी जास्तीत जास्त सतर्क रहावे.असे आवाहन त्यांनी केले.

सौ.कोल्हे पुढे म्हणाल्या, मतदार संघातील घरकुले, रेशनकार्ड, दुबार रेशन कार्ड, संजय गांधी निराधार, आदिवासीसह अन्य गरजुंचे जातीचे दाखले, सिंचन पाटपाणी, शहरवासियांचे पिण्यांचे पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, विविध गावच्या पाणी योजना, तरूण युवकासह विद्यार्थ्याचे, महिला बचतगट, कोरोना महामारीमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या वारसांचे सानुग्रह अनुदान, निळवंडे, गोदावरी कालवे निर्मीती व दुरूस्ती, ठिबक सिंचन, पुरग्रस्त नुकसान भरपाई रक्कम, विमा, शेती आणि शेतकरी, धोंडेवाडी अतिक्रमण पुर्नवसन, वीज रोहित्र यासह कित्येक किरकोळ प्रश्नांची सोडवणुक होत नाही फक्त महाविकास आघाडी शासनाच्या पोकळ घोषणा. विकासाचे आभासी चित्र रंगवून साईबाबांच्या नावाने खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे, कुठल्याही निवडणुकीत गोबेल्स नितीला बळी न पडता भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करून विरोधकांना चपराक द्यावी असे त्या म्हणाल्या.

राजेंद्र गोंदकर म्हणाले की, कार्यकत्यांनी बुधनिहाय संघटन वाढवुन भाजपामार्फत होत असलेल्या कामाची आठवण करून देत उपेक्षीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी ताळागाळातील घटकापर्यंत पोहोचावे. शेवटी श्री. बिडवे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page