त्या ५ हजार लाभार्थ्यांचा घरकुलात समावेश करावा -स्नेहलता कोल्हे.
Those 5,000 beneficiaries should be included in the household – Snehalta Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon21 Fab2022 16:30Pm.
कोपरगांव : सिस्टीम रिजेक्टेडच्या नावाखाली ५ हजार प्रस्ताव नामंजुर करण्यात आले त्या ५ हजार लाभार्थ्यांचा पात्र घरकुलात समावेश करावा यासाठी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरावा असे पत्र भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
या निवेदनात सौ. कोल्हे यांनी म्हटले आहे की कोपरगांव तालुक्यातील १९ हजार घरकुल लाभार्थी पैकी ५ हजार शासकिय निकष लावुन वगळून वगळण्यात उर्वरीत १४ हजार घरकुल यादीचे पात्र अपात्रतेचे काम पंचायत समितीने नेमलेल्या सर्वेक्षण कमिटीने नुकतेच केलेले आहे. किचकट निकष लावून गरजवंतांना वंचित ठेवले जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ‘ड’ यादीचे फेर सर्वेक्षण होवुन त्यांना न्याय मिळावा व सर्वच घरकुल लाभार्थ्याचा ‘ड’ यादीत समावेश होणेसाठी संबंधित विभागास आदेश व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.





