दोन वर्षात ३० गावांच्या पाणी योजनांसाठी आणला ९० कोटीचा निधी– ना. आशुतोष काळे

दोन वर्षात ३० गावांच्या पाणी योजनांसाठी आणला ९० कोटीचा निधी– ना. आशुतोष काळे

90 crore fund for water schemes of 30 villages in two years. Ashutosh Kale

११ गावच्या पाणीपश योजनांसाठी १०.११ कोटी निधीची मंजुरी               Approval of Rs. 10.11 crore for 11 village water supply schemes

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue22 Fab2022 17:00Pm.

कोपरगाव : दोन वर्षात ३० गावांच्या पाणी योजनांसाठी आणला ९० कोटीचा निधी आणला असल्याची माहिती नामदार आशुतोष काळे यांनी दिली आहे .  तर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून  ११ गावच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले .

मागील पाच वर्षात तालुक्यातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना रखडल्यामुळे पाठपुराव्यातून अनेक पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाल्या आहेत. आता ११ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटी निधी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आला आहे.                

यामध्ये तालुक्यातील १ कोटीच्या पुढील कारवाडी १९८.८७ कोटी, धोत्रे १३१.४७ कोटी, नाटेगाव ११५.९७ कोटी, या योजनांचा समावेश असून त्याचबरोबर खिर्डी गणेश ९६.१६ लक्ष,डाऊच खु. ८९.१७ लक्ष, तळेगाव मळे ८१.०९ लक्ष, पढेगाव ६९.१० लक्ष, लौकी ६७.७५ लक्ष, अंचलगाव ५८.१५ लक्ष, , बक्तरपुर ५५.५६ लक्ष, वडगाव ४७.२६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.  निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्री घुले यांचे ना. आशुतोष काळे त्यांनी आभार मानले आहेत.               

चौकट :- यापूर्वी १९ गावातील पाणी पुरवठा योजनांना जवळपास ८० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. व या ११ गावासाठी १०.११ कोटी निधी मंजूर करून एकूण ३० गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी ९० कोटीचा निधी आणला असून येत्या काही दिवसात हा आकडा १०० कोटीच्या पुढे जाणार आहे.- ना. आशुतोष काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page