छत्रपती शिवरायांचे गड किल्ले संवर्धन ही काळाची गरज – सौ. स्वाती कोयटे
Conservation of forts of Chhatrapati Shivaji is the need of the hour – Mrs. Swati Koyte
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWes23 Fab2022 17:00Pm.
कोपरगाव : विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा,त्यांची शिकवण,तत्व,विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत तसेच शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती संदीप कोयटे यांनी केले.
गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धती अवलंबणारी महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रीत शिक्षण संस्था असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंकाई किल्ल्यावर जाऊन तेथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करून आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली. या उपक्रमावर त्या बोलत होत्या,
सौ. स्वाती कोयटे पुढे म्हणाल्या, स्वच्छता व वृक्षारोपण यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले ऐतिहासिक किल्ले,वास्तू आदींचे संवर्धन होणार असून भविष्यात निर्माण होणाऱ्या अस्मानी संकटांपासून सुरक्षितता मिळणार आहे. त्याचबरोबर समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंकाई किल्ल्या वर राबविलेला स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी शैक्षणिक संचालिका सौ. लिसा बर्धन व उपप्राचार्य समीर अत्तार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.उपक्रम यशस्वीतेसाठी समता स्कूलच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.