ना. काळेंच्या सूचनेनुसार कोपरगाव बाजार समितीत हमीभाव हरबरा खरेदी नोंदणी सुरू
No. As per Kale’s suggestion, registration of guaranteed gram purchase has started in Kopargaon market committee
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWes23 Fab2022 17:30Pm.
कोपरगाव: हरबरा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे हमी भावाने हरबरा खरेदी केंद्र मंजूर झाले आहे.हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हरबरा हमीभावाने विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक नामदेव ठोंबळ यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले आहे.
सद्यस्थितीला हरबरा पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे.मागील काही वर्षापासून पर्जन्यमान समाधानकारक होत असल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन देखील वाढले आहे. यावर्षी देखील हरबरा उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे एकाच वेळी हरबरा विक्रीस आल्यास व्यापाऱ्यांकडून दर घटविले जावून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे हमी भावाने हरबरा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाणे ७/१२ उतारा, उताऱ्यावर हरबरा पीक पेरा नोंद आवश्यक असून आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, कॅन्सल /रद्द केलेला चेक आदी कागदपत्रांची हरबरा विक्री नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहे.नोंदणी क्रमानुसार शेतकऱ्यांना हरबरा कृषी उत्पंन बाजार समितीमध्ये घेवून येण्यासाठी ऑनलाईन मेसेजच्या माध्यमातून माहिती दिली जाईल व हमी भावाने खरेदी केलेल्या हरबरा पिकाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक नामदेव ठोंबळ व सचिव नानासाहेब रनशुर यांनी दिली असून हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनीआपला हरबरा बाजार समितीमध्ये विक्री करून आपले नुकसान टाळावे असे आवाहन केले आहे.