प्रशासकीय यंत्रणा हातचे बाहुले बनवून तालावर नाचत आहे – विवेक कोल्हे

प्रशासकीय यंत्रणा हातचे बाहुले बनवून तालावर नाचत आहे – विवेक कोल्हे

The administration is dancing to the beat of Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWes23 Fab2022 17:40Pm.

कोपरगांव: माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी प्रशासन व नागरीक यांची सांगड घालून दुजाभाव न करता सर्वांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, मात्र अलीकडे प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराचे केंद्र व दलालांचे हस्तक होऊन ठरावीक एकाच कुटुंबाचे हातचे बाहुले बनुन त्यांच्या तालावर नाचत याचा घणाघाती आरोप जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मंगळवारी तहसीलदार कचेरीतील एका बैठकीत केली.

प्रशासकीय यंत्रणेने सोमवारी (२१) रोजी झालेल्या प्रशासकीय बैठकीत मतदार संघातील ४८ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांना टाळण्यात आले यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्या टाळण्यात आलेल्या ४८ सरपंच उपसरपंच यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी(२२) दुपारी ३.३० वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार विजय बोरुडे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, तालुण्यात वीज, रस्ते, पाटपाणी, आरोग्य, पंतप्रधान आवास घरकुल योडाना, ड अपात्र यादी, शीव रस्ते, रेशनकार्ड, अन्नसुरक्षा आदि असंख्य प्रश्न प्रलंबीत असून त्याबाबत आपण तहसील, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री आदि पर्यंत अनेकवेळा तक्रारी केल्या परंतू त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या, जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेला निधीच्या कामावर आमदार ठेकेदार नेमतात त्यामुळे अनधिकृतपणे ठेकेदाराला पेमेंट मिळते कागदावर मात्र ग्रामपंचायत प्रमुख एजन्सी दिसते त्यामुळे कामाचा दर्जा व ऑडिटची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीवर येते. गेल्या दोन महिन्यापासून शासकीय विविध योजनांच्या बैठका न झाल्यामुळे अनेक नागरिक लाभापासून वंचित आहे. अनेक प्रलंबित प्रश्न उपस्थित करून तहसील, पंचायत समिती प्रशासनाने त्याची ताबडतोब सोडवणुक करावी अशी मागणी विवेक कोल्हे यांनी यावेळी केली.

प्रशासकीय यंत्रणेने कुणाचे नोकर न बनता जनतेचे सेवक बनावे व पक्षपातीपणा सोडावा अन्यथा नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी राजेंद्र वैराळ, संपत डीबरे, गवारे, सांगळे, कानिफनाथ गुंजाळ, संतोष दवंगे, मुकुंद काळे, मिराबाई निंभोरे, कैलास राहणे, बाळासाहेब पानगव्हाणे, दादासाहेब संत, मनोज तुपे, बबनराव निकम, प्रकाश भाकरे, गोरख कोकाटे, बाळासाहेब वक्ते, शिंदे, किरण साळुंके, दिपक चौधरी, विक्रम पाचोरे, उत्तमराव चरमळ, सुनिल देवकर, केशव भवर, बी. आर.काळे, राजेंद्र कोळपे, सोपानराव पानगव्हाणे, एल. डी. पानगव्हाणे, भिमा संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, वेणुनाथ बेळीज, सतिष आव्हाड आदिंनी आपल्या भाषणातून गावपातळीवरील प्रलंबीत प्रश्न मांडुन त्याच्या सोडवणुकीसाठी तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी केली.

गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी ड यादीतील अपात्र घरकुलांचा प्रश्नी सर्व अपिलांची दहा दिवसात थेट गाव पातळीवर जाऊन त्याचे निरसन करू, या तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने गाय गोठे योजनेच्या अंमलबजावणीसाठी अकुशल कामाची अट महत्वाची आहे, तर तहसिलदार विजय बोरुडे यांनी नागरिकांनी जे- जे प्रश्न उपस्थीत केले त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू असे सांगितले शेवटी केशव भवर यांनी आभार मानले.

चौकट-

माहेगाव देशमुख सह गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अनधिकृत वाळू उपसा बाबत सोमवार तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने एसीबी कडे तक्रार करणार असे बी. आर. काळे यांनी या सभेत बोलताना सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page