कोपरगांव बेट कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी
Preparations for Mahashivaratra celebrations at Kopergaon Island Kacheshwar Temple
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWes23 Fab2022 17:50Pm.
कोपरगांव :सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव बेट भागातील प्रति त्रंबकेश्वर समजल्या जाणा-या कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी सुरू असुन अंतर्गत साफ सफाई व रंग रंगोटीचे काम हाती घेण्यांत आले आहे, भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या पर्वकाळात दर्शन सोहळयासाठी उपस्थित रहावे असे आवाहन बेटवासिय, अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश सचिव व कचेश्वर देवस्थानचे वंशपरंपरागत व्यवस्थापक पुजारी रमेश उर्फ काशिनाथ भाउराव क्षीरसागर यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कचेश्वर मंदिर अतिशय पुरातन व ऐतिहासिक आहे त्याच्या दुरूस्तीबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच पुरातन वास्तु विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासुन पर्जन्यमान जास्तीचे झाल्याने या मंदिराची काही प्रमाणांत पडझड झाली आहे. तीर्थक्षेत्र अंतर्गत त्याचा विकास व्हावा अशी असंख्य भाविकांनी मागणी केली आहे.
गुरू शुक्राचार्य यांच्याकडुन संजीवनी मंत्राची दिक्षा कचेश्वरांनी येथेच घेतली. संपुर्ण भारतभूमीत कोपरगांव बेट भागात कचेश्वराचे हे एकमेव मंदिर आहे. शिवरात्रीनिमीत्त साफ सफाई स्वच्छता पुर्ण करण्यात आली आहे.
पुण्यक्षेत्र पुणतांबा चांगदेव महाराजांच्या समाधी सोहळयास जातांना कचेश्वरी संत निवृत्तीनाथ, बहिण मुक्ताई, पंढरीचा पांडुरंग यांनी मुक्काम करून पुढे नेवासा येथे वास्तव्य केल्याचा उल्लेख नामदेव गाथेत असुन यास्थानाला विशेष महत्व आहे. शिवभक्त अरविंद महाराज यांनीही या माहितीचा कार्यप्रसार करून ते नेहमीच येथे दर्शनासाठी येत असतात. त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्री होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम कचेश्वरी केल्यास सिध्द होतात असे प्रमाण वर्षानुवर्षे मानले गेले आहे.
यास्थानावर कालसर्पशांती, त्रिपडी, नारायण नागबळी, ग्रहशांती, विवाह आदि धार्मीक कार्यक्रम विनामुहुर्त होतात.. ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी कचेश्वरी छत्रीचा जीर्णोध्दार करून रूद्रयाग करत या स्थानाची माहिती संपुर्ण भारतभर पसरविली. त्यांचे येथे अनंतकाळ वास्तव्य होते. महाशिवरात्र पर्वकाळात विविध धार्मीक कार्यक्रम कचेश्वरी आयोजित केले असुन त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासुन मंदिरस्थाने बंद होती. पान, फुल, खडीसाखर, बेल, श्रीफळ, उदबत्ती आदि पुजा साहित्याची दुकाने येथे थाटली जातात.