कोकमठाणच्या तीन खणीत दासनवमीनिमीत्त भिक्षा फेरी

कोकमठाणच्या तीन खणीत दासनवमीनिमीत्त भिक्षा फेरी

Begging round for Dasanavami in three mines of Kokmathan

कोपरगांव : ब्रम्हलिन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाउ कोल्हटकर यांनी कोकमठाण पंचक्रोशीत वास्तव करत योग, तप साधना केली अशा पवित्र तीनखणी स्थानावर सालाबादप्रमाणे याही वर्षी दासनवमी निमीत्त भिक्षाफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

 यात ह भ. प रामदास महाराज वाघ, रामदासीबाबा भक्त मंडळाचे शरद थोरात, राजेंद्र महाजन, अशोक टेके, चांगदेव लोहकणे, विश्वनाथ सदाफळ यांच्यासह असंख्य भाविक सलग नउ दिवसापासुन सामिल झाले आहेत.

ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी मसुराश्रमाचे विनायक महाराज मसुरकर यांचे शिष्यत्व पत्करून सज्जनगड समर्थ रामदास स्वामी स्थानावर तपसाधना केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण करून दक्षिणकाशि गंगा गोदावरीनदी काठावरील कोकमठाण गावाला कर्मभूमि मानत येथील तीनखणीत असंख्य भाविकांना भक्तीचा सन्मार्ग दाखविला.

रामदासीबाबांनी त्यांच्या हयातीत सुमारे १९४७ सालापासुन कोकमठाण येथे दासनवमी उत्सव सुरू केला होता. यंदाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असुन दासनवमी व्यतिरिक्त ब्रम्हलिन संत रामदासीबाबांनी गीताजयंती, वैकुंठ चर्तुदशी हरिहर भेट, रामनवमी, हनुमान जयंती, कुंभमेळा, ऋषीभोजन, गोकुळअष्टमी, अधिकमास, गीता संथा, मारूती स्तोस्त्र, गणपती अथर्वशिर्ष, योगसाधना, भारतातील तीर्थक्षेत्रे, लहान मुलांना अध्यात्मीक संस्कारासह भजन संध्या यासह असंख्य नाविन्यपुर्ण धार्मीक उपक्रम सुरू करून सज्जनगडासह श्रीमंत दगडुशेठ गणपती पुणे, तुळजापुर, गाणगापुर, गोंदवले, अक्कलकोट, पंढरपुर, नेवासा, पैठण, शृंगेरी शंकराचार्य पीठ कर्नाटक, कोल्हापुर, बद्रीनाथ केदारनाथ सह काशी चारधाम, हिंदु महासभा आदि ठिकाणचे वर्षभरातील सर्व व्रतवैकल्ये, सण यांना आर्थीक मदत पोहोचवुन विशेष योगदानात त्यांचा सततचा सहभाग होता. पुढच्या पिढीला ब्रम्हलिन संत रामदासीबाबांविषयी माहिती व्हावी या उददेशांने कृष्णा गोदाकाठचे योगी, तीनखणीचा रामानुभव, रामदासीबाबा आणि समर्थविचारधारा ही तीन पुस्तके भक्त मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यांत आली आहेत.

दासनवमी भिक्षाफेरीला कोकमठाण पंचकोशीवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तीनखणीचे अद्यावत नुतणीकरण करण्यांत आले असुन समाधी मंदिराशेजारी भव्यदिव्य सभामंडप उभारला आहे तेंव्हा भाविकांनी कोकमठाण येथे अवश्य भेट द्यावी असे आवाहन शेवटी शरद थोरात यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page