मनाला सन्मार्गाला लावण्यासाठी भारत भूमिवर संत अवतरले- हभप. पवार

मनाला सन्मार्गाला लावण्यासाठी भारत भूमिवर संत अवतरले- हभप. पवार

Saints descended on the land of India to guide the mind. Pawar

कोपरगाव :  कलियुगात मानव हा विविध समस्यांनी ग्रस्त असेल. स्वार्थ आणि अहंकार, अविश्वासा चा कळस गाठेल. यामध्येच प्रारब्धाचा सामना करणारे मानवी मन दिशाहीन व अशांत होईल. म्हणून या मनाला सन्मार्गाला लावण्यासाठी भारत भूमिवर संत अवतरले होते असे प्रतिपादन लासलगाव येथील हरिभक्त परायण निलेश महाराज पवार यांनी केले.

  कोपरगाव येथील श्री गजानन महाराज सत्संग मंडळाच्यावतीने १४४ वा प्रकट दिन सोहळा धार्मिक परंपरेने साजरा केला त्यावेळी ते बोलत होते.  

ते म्हणाले शेगावचे संत गजानन महाराज त्यापैकीच एक होते. शेगाव ते थेट अमेरिके पर्यंत त्यांची मंदिर आणि भक्त परिवार आहे. माघ वद्य सप्तमीस महाराज शेगावात प्रकटले. महाराजांनी जीवनात चमत्कार केले नाहीत तर भक्तांना तारण्यासाठी ते घडत गेले. महाराजांच्या जीवनकाळात जेवढे चमत्कार घडले त्यापेक्षा कित्येक पटीने आजही या विज्ञान युगात श्रद्धावान भक्त अनुभवत आहेत. संत गजानन महाराज हा भक्तांना जीवनात फार मोठा आधार आहे.                                          

Leave a Reply

You cannot copy content of this page