नागरिकांनो घरपट्टी, नळपट्टी, व्यावसायिक गाळे कर भरा, सहकार्य करा- शांताराम गोसावी

नागरिकांनो घरपट्टी, नळपट्टी, व्यावसायिक गाळे कर भरा, सहकार्य करा- शांताराम गोसावी

Citizens, pay taxes on house rent, plumbing, commercial rent, cooperate – Shantaram Gosavi

घरपट्टी नळपट्टी वसूल २५ टक्के झाला असून ७५ % थकबाकी आहे
एकूण वसूल १२ कोटी ५६ लाख १९ हजार २५८ रुपये,पैकी नागरिक थकबाकी १२कोटी १२ लाख ४५ हजार ३१८ रूपये, शासकीय कार्यालय थकबाकी ४३,७३,९४०/-
Household plumbing recovery is 25% and 75% is outstanding
Total recovery is 12 crore 56 lakh 19 thousand 258 rupees, out of which civil arrears are 12 crore 12 lakh 45 thousand 318 rupees, government office arrears 43,73,940 / –

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWes23 Fab2022 19:50Pm.

कोपरगाव : एकूण घरपट्टी आणि नळ पट्टीच्या मागणी पैकी घरपट्टी नळपट्टी वसूल २५ टक्के झाला असून ७५ % थकबाकी आहे.यात एकूण वसूल १२ कोटी ५६ लाख १९ हजार २५८ रुपये,पैकी नागरिक थकबाकी १२ कोटी १२ लाख ४५ हजार ३१८ रूपये, शासकीय कार्यालय थकबाकी ४३,७३,९४०/- इतकी आहे. तेंव्हा नागरिक व शासकीय अधिकारी यांनी घरपट्टी, नळपट्टी, व्यावसायिक गाळे कर भरा, सहकार्य करा असे आवाहन नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या करांची वसुली शहरांमधील सोईसुविधा वाढवण्यासाठी वापरली जाते. जर शहरातील नागरिकांनी कर वेळेत जमा केला नाही तर शहरातील नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा जसे कि, विद्युत, स्वच्छता, रस्ते बांधकाम, पाणी व इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला अडचणी निर्माण होतात.

याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच एकूणच दैनंदिन जीवनावर होत असतो ही बाब लक्षात घेऊन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरांमधील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी, व्यवसायिक गाळा धारकाची कर वसुलीची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत.

सर्व शासकिय कार्यालय यांना कर बिले देण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी दोन वेळा स्मरणपत्र दिलेले आहे.
शासकीय कार्यालय कर थकीत तपशिल,संकलित कर,पाणी पट्टी करग्रामीण रुग्णालय,घरपट्टी ५,१५,६६६/-+नळपट्टी १,७१,७०१/- एकुन (६,८७,३६७/-) तहसील कार्यालय-घरपट्टी १४,१९,६८७/-
+नळपट्टी ६१८४३/- एकुन (१८,०५,८०८/-) मा.सेक्रेटरी महसूल भवन- एकुन १,६९,८७४/-,धान्य गोडावून एकुन १,४२,९८७/- , तहसीलदार निवास २७६०/- पंचायत समिती क्वार्टर ७,२०,९०१/-,पोलिस स्टेशन कार्यालय ६७९०३/- +१,००,६८२/-एकुन १,६८,५८५/-,
पोलिस स्टेशन क्वार्टर एकुन २,७१,१९३/- मे.एक्झी. इंजि. बी अँड सी ४०८०/-+६३,२८२/- एकुन ६७,३६२/-,मे.सब डिव्हिजनल ऑफिसर, इरिगेशन ७५,५२१/-+
४,८८,१४८/- एकुन ५,६३,७०५/-
गोदावरी डावातट कालवा चाळ,रेल्वे स्टेशन रोड एकुन ३७,२३४/- तालुका कृषी अधिकारी द्वारा महामंडळ एकून
४४०१/- एकात्मिक बालविकास योजना २४,९३३/-+ ४१४४/-एकुन
२९,०७७/- सर्व शासकीय मागणी एकूण घरपट्टी २४,९२,०६४/-+नळपट्टी
१८,८१,८९४/- एकुन ४३,७३,९४०/- अशी आहे.

सर्व जबाबदार नागरिकांनी तसेच शासकीय कार्यालयाने आपल्या कडील येणे बाकी असलेली सर्व कर रक्कम विहित वेळेत भरावी व प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून कुठलीही कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू नये. तसेच आपल्याकडे येणाऱ्या कर वसुली पथकास योग्यते सहकार्य करावे. असे आव्हान प्रशासक मुख्याधिकारीशांताराम गोसावी यांनी केले आहे

 

चौकट
२० फेब्रुवारी २०२२ अखेर कर वसुली स्थिती एकूण घरपट्टी ६ कोटी २८ लाख ६३ हजार ३०४, एकूण नळपट्टी ६ कोटी २७ लाख ५५ हजार ९५४ अशी एकूण १२ कोटी ५६ लाख १९ हजार २५८ रुपये घरपट्टी नळपट्टी मागणी आहे पैकी घरपट्टी २ कोटी २५ लाख ७२ हजार १३ नळ पट्टी १ कोटी ७३ लाख ४५ हजार ८२४ अशी एकूण ३ कोटी ९९ लाख १७ हजार ८३७ रुपये वसूल झाली, असून एकूण थकबाकी घरपट्टी ४ कोटी १ लाख ४० हजार ३१० एकूण थकबाकी नळपट्टी ४ कोटी ५२ लाख एकूण ९० हजार ८४२ अशी एकूण थकबाकी ८ कोटी ५४ लाख ३० हजार १५२ इतकी आहे – प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी

Leave a Reply

You cannot copy content of this page