कोपरगाव तालुक्याला अतिवृष्टी नुकसानीचे २.७१ कोटी – ना. आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्याला अतिवृष्टी नुकसानीचे २.७१ कोटी – ना. आशुतोष काळे

2.71 crore of excess rain damage to Kopargaon taluka – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu24 Fab2022 17:00Pm.

कोपरगाव: मागील वर्षी २०२१ ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने २.७१ कोटी नुकसान भरपाई मंजूर केली असल्याची माहिती श्री साई संस्थान अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात कोपरगाव तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या नुकसानीचे पंचनामे करावे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व नुकसानीचे पंचनामे होतील याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यावेळी ना. आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिल्या होत्या. त्या सुचनेनुसार सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री ना.विजय वडेट्टीवार तसेच कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव तालुक्यासाठी २ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. हि रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.यापूर्वी ३ कोटी ९ लाखाचे अनुदान वाटप केले आहे. असल्याची माहिती ना. काळे यांनी दिली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार संकटकाळी शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून झालेल्या नुकसानीची भरपाई देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वेळेवर देत आहे. नुकसान भरपाई दिल्यामुळे मतदार संघातील जनतेच्या वतीने ना. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page