बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा मिळेना? वन अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
Can’t find a cage to catch leopards? Wacky answers from forest officials
अबनावे वस्ती सर्कलमध्ये बिबट्याची “दहशत’Leopard’s ‘terror’ in Abnave Vasti Circle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu24 Fab2022 17:20Pm.
कोपरगाव : गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील जेऊर कुंभारी अबनावे वस्ती सर्कलमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जेऊर कुंभारी अबनावे वस्ती यशवंत अबनावे सर्वे नंबर ३५/४, नितीन अबनावे सर्वे नंबर ३४/३, दिलीप सांगळे सर्वे नंबर ३३ सर्कलमध्ये बिबट्याचा जास्त वावर होताना दिसत आहे. या परिसरात उसाच्या शेतांमधून इकडे तिकडे जाताना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात बिबट्यांची जास्त संख्या असण्याची शक्यता आहे. वन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर नागरिकांनी चर्चा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परतीच्या पावसाने अगोदरच शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, तर दुसरीकडे बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाला आहे.