रामनवमी होणार पारंपरिक पद्धतीनेच साईपालखी आणण्यास परवानगी – ना. आशुतोष काळे
It will be Ram Navami. Permission to bring Saipalkhi –Ashutosh Kale
साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांकडून आनंद व विश्वस्तांच्या निर्णयाचे स्वागत Anand from Sai Bhakt and Shirdi villagers and welcome the decision of the trustees
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu24 Fab2022 20:20Pm.
कोपरगाव : मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव देखील साईभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला नव्हता. मात्र कोरोनाचे सर्वच निर्बंध शासन सेवेतील करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थान विश्वस्त मंडळाने रामनवमी उत्सव व देशभरातून येणाऱ्या साई पालखी घेऊन येण्यास परवानगी दिली असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने वर्षभर रामनवमी उत्सव, गुरु पौर्णिमा उत्सव, श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव आदी उत्सव धार्मिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. मात्र दोन वर्षापासून कोरोनामुळे हे उत्सव धार्मिक पद्धतीने साध्या स्वरूपात साजरे करण्यात आले. यावर्षी रामनवमी उत्सव साजरा करण्याबाबत विश्वस्त मंडळाची बैठक अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त मा.आ. जयवंतराव जाधव, डॉ.एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.भाग्यश्री बाणायत आदी मान्यवर उपस्थित होते. ९ एप्रिल ते ११ एप्रिल या तीन दिवस साजरा करण्यात येणारा रामनवमी उत्सव हा साईभक्तांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने साजरा केला जावा. तसेच रामनवमीला येणा-या साईपालख्यांना परवानगी देणेबाबत एकमताने मंजुरी देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
यावेळी स्व. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली ठराव घेण्यात आला. व रामनवमी साजरा करणे बरोबरच इतर विषयांवर देखील विश्वस्त मंडळाने सविस्तर चर्चा केली.
चौकट :- विश्वस्त मंडळाने पारंपारिक पद्धतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेवून साठी साईभक्तांना साईपालखी आणण्यास परवानगी दिल्यामुळे साईभक्तांसाठी हि अतिशय आनंदाची बातमी असून विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे साईभक्तांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचा फायदा शिर्डीतील असंख्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना होणार आहे. शिर्डीतील कोलमडलेली अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी देखील विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.