कोपरगाव :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पोहेगावात आगमन, शिव जल्लोषात स्थापना

कोपरगाव :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पोहेगावात आगमन, शिव जल्लोषात स्थापना

Kopargaon: Arrival of statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Pohegaon, installation at Shiva Jallosha

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fir 25 Fab2022 14:20Pm.

कोपरगाव : संपूर्ण पोहेगाव पंचक्रोशीला उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात आगमन झाले. पुतळा येणार म्हणून शेकडो शिवप्रेमींनी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर चौकात सायंकाळी उपस्थिती लावली हाेती. उघड्या आयशर ट्रकमधून पुतळा आणण्यात आला तेंव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घाेषणांनी परिसर दणाणून गेला हाेता. शेकडाे माेबाइलचे कॅमेरे हे दृश्य टिपत हाेते.

पुण्यातील परदेशी यांच्या स्टुडिओत हा पुतळा तयार करण्यात आला आहे. ताे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर चौकात जिथे बसवण्यात येणार आहे त्या चाैथऱ्याची पोहेगाव ग्रामपंचायतीमार्फत उभारणी पूर्ण झाली असली तरी सुशाेभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुतळा चौथऱ्यावर बसवून प्रतिष्ठापना करून पुढील कामे केली जाणार आहेत. अशी माहीती
राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे मार्गदर्शक नितीन औताडे यांनी केले.
राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती पोहेगाव ग्रामपंचायत व शिवभक्तांच्या सहकार्यातून हे शिवस्मारक उभारण्यात येत आहे.
या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याची उंची साडेनऊ फूट आणि तब्बल दीड टन वजन असलेला १३ लाख ५१ हजार रुपये किमतीचा ब्रांच धातूचा हा पुतळा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात पोहोचला. एका मोठ्या उघड्या ट्रकमधून पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या बंदोबस्तात हा पुतळा आणण्यात आला. पुतळ्याचे स्वागत करण्यासाठी शेकडो शिवप्रेमी दुपारपासूनच चार वाजेपासून होळकर चौकात जमले होते. पुणे संगमनेर तळेगाव मार्गे पुतळा दुपारी चार वाजता रांजणगाव देशमुख येथे आला त्या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात पुतळ्याचे स्वागत करून पूजन केले.
श्री ग. र. औताडे पाटील विद्यालय साई किसान पेट्रोल प़ंपाजवळ आल्याचे कळताच शिवप्रेमींनी तिकडे धाव घेतली. तेथून पाचशे ते सहाशे तरुण शिवभक्तांनी भव्य मोटारसायकल रॅली काढून ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चाैकापर्यंत घाेषणा देत निघाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. भगवे झेंडे, अंगात नवचैतन्य,लेझीम,ढोल ताशा,टिपरी.. चिमुकल्या बाल गोपाळांची वेशभूषा.. डोक्यावर भगवे फेटे,संबंध पोहेगावच्या रस्त्यावर रांगोळ्यांची आरस, डिजे.. टाळ-मृदंगाच्या गजरात पोहोचला पोहेगाव पंचक्रोशीतील शिवभक्तांनी या पुतळ्याचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. गिरीश जोशी गुरू यांनी वैदीक पध्दतीने मंत्रघोषात अश्वारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व शिवप्रेमींच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. दोन क्रेनच्या साहाय्याने ७ वाजता पुतळा चौथऱ्यावर बसवला

या वेळी सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, रमेश झांबरे, अशोक औताडे, दादासाहेब औताडे, विलास रत्ने, सरपंच संजय गुरसळ,काका शिंदे, रुत्विक औताडे,अंकीत औताडे, निखिल औताडे, नंदकुमार औताडे,प्रवीण गायकवाड, रवी चौधरी, सुनील पवार, राहुल औताडे,ज्ञानेश्वर औताडे, राजेंद्र औताडे, सचिन वाके, संदीप औताडे, अंकित औताडे, गौरव औताडे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुनील लोखंडे,ज्ञानदेव वाके, विनायक मुजगुले, विनायक औताडे, माधव गायकवाड, दिगंबर पवार आदीसह राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या अश्वारुढ पुतळ्याचे वास्तुशिल्प डिझाईन इंजिनीयर रवीकिरण डाके व अरविंद औताडे यांनी केले असून वास्तुशिल्प प्रमाणे ३० लाख रुपये खर्चाच्या चौथरा व सुशोभीकरण देखरेखीचे काम ऋतिक औताडे यांनी विनामोबदला केले आहे.

पुतळा अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा मनोदय असून नुकतेच नेवासा येथे यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी मार्च महिन्यात अनावरणा साठी तारीख देण्याची व या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब किंवा मी येईल अशी ग्वाही दिली आहे. या चर्चेच्या वेळी खासदार सदाशिव लोखंडे व मंत्री शंकरराव गडाख हे ही उपस्थित होते असे  नितीन औताडे यांनी सांगितलं.

Leave a Reply

You cannot copy content of this page