शिर्डी साई भक्तांसाठी कोपरगाव रेल्वे स्टेशनवर सोयीसुविधासाठी रेल्वे जीएमकडे मागणी

शिर्डी साई भक्तांसाठी कोपरगाव रेल्वे स्टेशनवर सोयीसुविधासाठी रेल्वे जीएमकडे मागणी

Demand from Railway GM for convenience at Kopargaon railway station for Shirdi Sai devotees

 खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत रिक्षा संघटना,  संवत्सर व  शिंगणापूर ग्रामपंचायत यांनी  केल्या मागण्या Demands made by Rickshaw Association, Sanvatsar and Shingnapur Gram Panchayat in the presence of MP Sadashiv Lokhande

कोपरगाव : अ प्लस दर्जा मिळालेल्या कोपरगाव रेल्वे स्थानकात पुणे नागपूर गरीब रथ, पुणे हावडा दुरंतो एक्सप्रेस, शिर्डी कालका एक्सप्रेस, शिर्डी विजयवाडा एक्सप्रेस, शिर्डी विशाखापट्टणम एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस, या रेल्वे गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी उद्योगपती कैलासचंद्र ठोळे यांनी सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत निवेदन देऊन केली यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही या मागण्यांना दुजोरा दिला व चर्चेत भाग घेतला. तसेच रेल्वे स्थानकावर गुड शेड वॉटर सॉफ्टनर प्लांट पिण्याचे पाणी ,साई यात्री निवास आदी सोयीसुविधा केल्यास कोपरगावच्या निश्चितपणे वैभवात भर पडून अनेकांना रोजगार, उद्योगधंदे उपलब्ध होतील. बाजारपेठ आणखी सुधारण्यास मदत होईल असे प्रतिपादन ठोळे यांनी लाहोटी यांच्या भेटी प्रसंगी बोलताना केले.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बरोबर कोपरगाव रेल्वे स्टेशन वरील सुविधा बाबत चर्चा करताना उद्योगपती कैलासचन्द्र ठोळे शिवसेना पदाधिकारी प्रमोद लबडे कैलास जाधव, नितीन औताडे, शिवाजी ठाकरे, राजेंद्र सालकर आदी दिसत आहेत.

त्यावर जनरल मॅनेजर लाहोटी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ते निर्णय घेऊन लवकर त्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे रिक्षा-टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव,उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, शिवसेनेचे नितीन औताडे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे शहर प्रमुख कलविन्दर दडियाल, किरण खर्डे, संवत्सर चे युवक नेते विवेक परजणे, शिंगणापूरचे सरपंच संवत्सरकर, हुंडेकरी बाळासाहेब रुपनर, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समवेत उद्योगपती शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव प्रमोद लबडे नितीन औताडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,संवत्सर व शिंगणापूर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ दिसत आहेत

कैलासचन्द्र ठोळे म्हणाले, साईबाबांची शिर्डी आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असल्याकारणाने ते कोपरगाव पासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या स्थानकावर साईभक्त प्रवासी मोठ्या प्रमाणावर उतरतात त्यामुळे जास्तीत जास्त सोई सुविधा व सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिल्यास प्रवाशांची वेळेची व पैशाची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.

सध्या रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही मात्र हे पाणी पचनास जड असल्याने येथे सॉफ्टवॉटर प्लांट टाकण्यात यावा, तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन वर पिण्याचे पाणी, स्टेशनबाहेर पे अँड युज सुलभ शौचालय, टी स्टॉल, बुक स्टॉल, मेडिकल शॉपी आदी सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे स्थानक परिसरात तसेच कॉलनी परिसरात संरक्षक भिंत उभारावी, आजूबाजूस विविध झाडांची लागवड व सुशोभिकरण करण्यात यावे, रोटेगाव कोपरगाव रेल्वे लाईन त्वरित टाकण्यासाठी पावले उचलावीत, रेल्वेकडे जागा उपलब्ध असल्यास सह्याद्री निवास उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, मालधक्का परिसरात डांबरीकरण करण्यात यावे, लॉन्ग साईड प्लॅटफॉर्म चे काँक्रिटीकरण करण्यात यावी, ज्यामुळे मालाची चढ उतर करण्यात सुलभता येऊ शकेल, पाऊस पाण्यापासून बचावात्मक बचावासाठी कव्हर शेड उभारावी, सध्याचा मालधक्का वाढवून तेथे २० वॅगन बसतील असे नियोजन करावे, शेतकऱ्यांचा कांदा, मका, साखर, आदी मालाची आयात निर्यात करण्यासाठी त्यामुळे सुलभता येऊन येथे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. या सर्व सोयी सुविधा झाल्यास कोपरगावच्या वैभवात भर पडून कोपरगाव च्या बाजारपेठ सुधारण्यासाठी मोठा वाव व उद्योगधंदे वाढवण्याची संधी मिळू शकेल असे श्री ठोळे म्हणाले.

सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांचे बरोबर साडे आठ वाजता निरीक्षण परीक्षण रेल्वेगाडीने आगमन झाले. त्यांच्या समवेत रेल्वेच्या विविध विभागाचे सुमारे २०० च्या वरअधिकारी-कर्मचारी यांचा मोठा ताफा उपस्थित होता. स्थानिक रेल्वे प्रशासनाने त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी सर्वश्री कैलास जाधव, विवेक परजणे, शिंगणापूरच्या ग्रामस्थांनी विविध असलेल्या समस्या लाहोटी यांच्यासमोर मांडल्या. लाहोटी यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. लाहोटी यांनी रेल्वे च्या प्रदर्शनाची पाहणी केली. विविध विभागांना भेटी देऊन सूचना केल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page