क्रीडा महोत्सव : संजीवनी अकॅडमीच्या मुलांनी दोन वर्षानंतर लुटला मैदानी खेळाचा आनंद
Sports Festival: Children of Sanjeevani Academy enjoy outdoor sports after two years
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fir 25 Fab2022 14:40Pm.
कोपरगांव: संजीवनी अकॅडमी च्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतून वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेमुळे दोन वर्षानंतर अकॅडमीच्या १८० चिमुकल्यांनी मैदानी खेळाचा आनंद लुटला.तसे कोरोना काळातही ऑनलाइनद्वारे संजीवनी अकॅडमीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा व उपक्रमातून शारिरीक, मानसिक व बौध्दिकमुल्ये जपण्याचा प्रयत्न केलाच होता.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अकॅडमी संचालिका डॉ . मनाली कोल्हे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचा शुभारंभ केला. यावेळी डायरेक्टर ज्ञानेश्वर सांगळे प्रिन्सिपल डायरेक्टर सौ. सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्या सौ. शैला झुंजारराव, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
‘निसर्ग’ ही मध्यवर्ती संकल्पना विचारात घेवुन विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाचे महत्व अधिक वृध्दिंगत होण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात हनी बी, बटर फ्लाय, कॅटर पिलर, ऑस्ट्रीच , ट्वीटी, अशा स्पर्धांचा समावेश होता. पालकांसाठी बिंग बॅलंसिंग व सॅक रेसचा समावेश होता तर महिला पालकांसाठी रिले रेसचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी फुलपाखरांच्या जीवनातील विविध अवस्था तसेच मधमाशा कशा प्रकारे मध गोळा करतात या विषयावर नाटिका सादर केली. दोन वर्षापासून खेळापासून वंचित असल्याने उदास असलेल्या विद्यार्थ्यात वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने त्यांच्यात नवचैतन्य बहरले आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले तर पालकांना झाडाचे रोपटे भेट म्हणुन देण्यात आले.
क्रीडा प्रशिक्षक विरूपक्ष रेड्डी, यामिनी मिस्त्रा व अजित सदावर्ते यांनी क्रीडा यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.