समता ही सभासद हित जोपासणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था- सौ सुनंदा पवार
Samata is one of the leading credit unions in Maharashtra for the benefit of its members – Mrs. Sunanda Pawar
जामखेड समता शाखा शुभारंभ Jamkhed Samata Branch Launched
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fir 25 Fab2022 16:00Pm.
कोपरगाव – सभासद हित ओळखून
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तत्पर सेवेतुन आर्थिक फायदा करून देणारी समता ही महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था असल्याचे प्रतिपादन भीमथडी जत्रा संयोजिका सौ.सुनंदा राजेंद्र पवार यांनी बुधवारी (२३) रोजी जामखेड येथील समता शाखे शुभारंभ प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे हे होते.
सौ.पवार पुढे म्हणाल्या की, कोपरगाव महिला बचत गटाप्रमाणे काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड मधील बचत गटाच्या महिलांनाही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित केले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी करून दिला. सौ. सुनंदा पवार यांचा सत्कार समता महिला गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी केला.तर चेअरमन काका कोयटे यांनी यशवंत नागरी पतसंस्था चेअरमन राजेंद्र कोठारी,ज्योती क्रांती क्रेडीट सोसायटीचे चेअरमन आजिनाथ हजारे, यांचा सत्कार केला. जितुभाई शहा यांच्या हस्ते पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचालक अशोक शिंगवी, संत गोरोबाकाका कुंभार पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत,विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राळेभात,जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्या हस्ते एच.यु.गुगळे पतसंस्थेचे चेअरमन रमेश गुगळे, प्रतिष्ठीत व्यापारी महेश नगरे, मधुकर लोहकरे,सोनेतारण व्हॅल्यूअर श्रीकांत कुलथे,असि.जनरल मॅनेजर संजय पारखे यांच्या हस्ते जामखेड नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण चिंतामणी, दत्तात्रय वारे, सुरेश भोसले यांच्या हस्ते,माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण तर कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी आप्पा कोल्हे यांच्या हस्ते राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराडे,खर्डा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवकुमार गुळवे आदी प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.