कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करा- ना. आशुतोष काळे
Complete the survey of Kopargaon-Rotegaon railway line immediately. Ashutosh Kale
रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटींकडे मागणीDemand from Railways General Manager Anil Kumar Lahoti
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fir 25 Fab2022 17:30Pm.
कोपरगाव :प्रस्तावित कोपरगाव- रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करा अशी मागणी संस्थाध्यक्ष आमदार नामदार आशुतोष काळे यांनी रुटीन इन्स्पेक्शनसाठी आलेले सेंटर रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार राठोड यांच्याकडे शुक्रवारी(२५) रोजी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे केली.
सन २०१७ पासून प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव २२ किलोमीटरचा सर्व्हे आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. या रेल्वेमार्गात नदी, पूल, घाट नसून संपूर्ण दुष्काळी परिसर आहे. महारेल मार्फत अर्धा-अर्धा खर्च करण्याची शासनाकडून सहमती देण्यात आली आहे. मात्र केवळ सर्व्हे अभावी कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा प्रश्न अधांतरी लोंबकळत पडला आहे. याकडे ना. आशुतोष काळे यांनी रेल्वेचे जीएम अनिलकुमार लाहोटी यांचे लक्ष वेधून त्यांच्यासमवेत विविध समस्यांबाबत चर्चा केली.
कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गामुळे दुष्काळी भागातील दळणवळण वाढणार आहे. उक्कडगाव स्टेशनमुळे या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागाचा विकास साधला जाणार असल्यामुळे हा सर्वे तातडीने पूर्ण करावे यासह इतरही रेल्वेबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात संवत्सर रेल्वे स्टेशन पूर्ववत सुरू करणे.आंचलगाव ते चितळी रेल्वे बोगद्यातील साचणारे पाणी काढण्याची व्यवस्था करा, प्लॉटफॉर्म नंबर ३ ला लुक लाईन करणे व रुंदी वाढवा, लिप्टचे काम तातडीने सुरु करावे. कोपरगांव स्टेशन जम्बो साईडिंगला लुक लाईनमध्ये वर्ग करा, जम्बो गुड्स शेड मंजूर करावे. प्रस्तावितयशवंतपूर-निजामाद्दीन-राजधानी एक्सप्रेसला दौंड – मनमाड मार्गे वळविणे व कोपरगांवला थांबा द्यावा. दुरांतो एक्सप्रेस- गरीब रथ एक्सप्रेस – हमसफर एक्सप्रेस – संपर्क क्रांती एक्सप्रेस – शिर्डी कालवा एक्सप्रेस यांना कोपरगांव येथे थांबा देणे व संवत्सर रेल्वे स्टेशन येथे बांधण्यात आलेल्या कॉटर्सला ड्रेनेजची व्यवस्था करून मिळावी या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी ना. आशुतोष काळे यांना दिली.
यावेळी रेल्वेचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.