मंत्री नबाब मलिक यांना अटक; केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण :- ना. आशुतोष काळे

मंत्री नबाब मलिक यांना अटक; केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण :- ना. आशुतोष काळे

Minister Nabab Malik arrested; Central Government’s politics of repression: – No. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fir 25 Fab2022 17:40Pm.

कोपरगाव :अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटक म्हणजे विकासाच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण असल्याचा टिका ना. आशुतोष काळे यांनी शुक्रवारी शहरातील महात्मा गांधी चौकात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजीत महाविकास आघाडीच्या सभेत केला.

ना.काळे पुढे म्हणाले, केंद्र सरकार नोटबंदी व जीएसटी प्रणालीमुळे अनेक उद्योगधंदे बुडाले असून अनेकांच्या हातचे रोजगार कायमचे हिरावले आहे.बेरोजगारांच्या हाताला काम नाही. लॉक डाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून महागाई गगनाला भिडली आहे. केंद्र सरकार विकासाच्या बाबतीत अपयशी ठरली आहे.राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर लोकशाही पद्धतीने जाहीरपणे बोलत असल्यामुळे केंद्र सरकारने राजकीय सुडापोटी) केंद्रीय तपास यंत्रणा ईडी(अंमलबजावणी संचालनालय) चा वापर करून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. असा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावे लागणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले.

 नायब तहसीलदार श्रीमती मनिषा कुलकर्णी यांना कोपरगाव शहर व तालुका महाविकास आघाडीच्या वतीने ना.आशुतोष काळे यांनी निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा संदीप वर्पे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, सुनील साळुंके, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रीय युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. रेखा जगताप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखिल डांगे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, मनसेचे सुनील फंड, आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page