ना. आशुतोष काळे यांच्या आवाहनाचे उमटू लागले पडसाद
No. Ashutosh Kale’s appeal began to reverberate
कारवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; महिलांनी पाडले काम बंदCarwadi road works of inferior quality; Work stopped by women
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sun 27 Fab2022 17:00Pm.
कोपरगाव : येथील कारवाडी फाटा ते कारवाडी जाणाऱ्या काम योग्य पद्धतीने होत नसल्याने ते निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप करत परिसरातील महिलांनी हे काम बंद पाडले. ही घटना साधी सरळ वाटत असली तरी यामागे नामदार आशुतोष काळे यांनी केलेल्या आवाहनाचे पडसाद उमटू लागल्याचे दिसून येत आहे.
शहरातील रस्त्याच्या कामाची पाहणी करत असताना ना.आशुतोष काळे म्हणाले होते की, रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ठेकेदारांनी काळजी घ्यावी. रस्त्यांसाठी निधी वारंवार मिळत नाही त्यामुळे होणारे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. तेंव्हा रस्त्याची कामे निकृष्ट होत असेल तर तक्रारी करा,असे आवाहन नामदार आशुतोष काळे यांनी केले होते. त्याचा परिणाम तालुक्यासह शहरात दिसू लागला आहे.
लोकांमध्ये झालेल्या जनजागृतीचा परिणाम कारवाडी येथे महिलांनी बंद पडलेल्या रस्त्याच्या कामात दिसून आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा वार्षिक योजना २०२१ लेखा ३०५४ मार्ग व पुल ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रा.मा.०७ ते कारवाडी गावा दरम्यान ३० लक्ष रूपये खर्चुन होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत काम बंद केले. रस्त्यावर अगोदर पडलेले खड्डे न बुजवता त्यावरच बि. बि.एम केल्याने रस्ता खाली वर झाला खाणीतील पक्की खडीचा वापर न करता विहिरी वरील कच्ची खडी वापरली तसेच रस्त्यावरील धुळ साफ न करताच त्यावरच खडी पसरवली जात होती. टँग कोट नाही असे असंख्य आरोप करत सदर महिलांनी आम्हास नवीन रस्ता नको आमचा पुर्वीचाच रस्ता पाहिजे अशा घोषणा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शंकरराव फंटागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत दिल्या. यावेळी सचिन क्षीरसागर रविंद्र फंटागरे धनजंय झगडे अमोल शिलेदार दत्तात्रय भोसले सर्जेराव भोसले रमेश मोहिते भारत कोकाटे दिगंबर कोकाटे अर्जुन फंटागरे न्यानदेव फंटागरे आदि नी भाग घेत काम बंद पाडले. या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे